MP Shrikant Shinde | ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार, त्या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढवणार – खासदार श्रीकांत शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election 2024) एक वर्ष बाकी असताना राज्यातील प्रमुख पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अद्याप जागावाटप झालेले नाही. मात्र मित्र पक्षांकडून एकमेकांच्या जागावर दावा केला जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी मोठं विधान केलं आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार (Shivsena MP) आहे, त्याठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडणूक लढवणार असल्याचे श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी भरसभेत स्पष्ट शब्दांत सांगितले.

 

https://www.facebook.com/photo/?fbid=793511332131697&set=pcb.793511585465005

 

भाजपने (BJP) ‘मिशन 45’ हा आकडा लोकसभेच्या निवडणुकीसाठी लक्ष्य ठेवले आहे. या 45 खासदारांच्या मतदारसंघात कल्याण लोकसभा (Kalyan Lok Sabha) आणि पालघर लोकसभेचा (Palghar Lok Sabha) समावेश आहे. कल्याण लोकसभेवर भाजपचा डोळा आहे. भाजपकडून दावा केला जात आहे, अशी राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) चर्चा आहे. या विषयी खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांना विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते डोंबिवलीत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाले त्याचे नाव घ्या. भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे होत आहेत. ते केंद्राकडून देण्यात आले आहेत, त्यापासून आम्हाला काही त्रास नाही. प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना मजबूत करण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधत आहेत. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढवणार. हे केंद्र आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

 

खासदार श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) हे माझे मित्र आहेत.
ते जेव्हा जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा मी त्यांचे स्वागत केले.
त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये.

 

 

Web Title :  MP Shrikant Shinde | shivsena will contest the election where there is shivsena mp says shrikant shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा