विखे कुटूंबियांच्या राजकारणाबद्दल खा. सुजय विखेंचेच ‘वादग्रस्त’ विधान ! म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला, ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करून भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या विधानातून त्यांनी विखे कुटुंबियाच्या राजकीय आश्वासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नगर येथील सभेत बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की, नगर शहर मतदारसंघातून शिवसेनेकडून अनेकजण इच्छुक होते. मात्र राठोड यांना उमेदवारी मिळाली. तो धागा पकडत विखे राठोड यांना उद्देशून म्हणाले, ‘तुमचे आता वय झाले आहे. पण एवढी घ्या मारुन अन् रिटायर व्हा. म्हणजे बाकी लोकांचे नंबर लागतील. आमदार व्हायचे असेल तर जे इच्छुक आहेत. त्या प्रत्येकाला पुढच्या आमदारकीचा शब्द द्या. फक्त कुणाला शब्द दिला, हे इतरांना कळू देऊ नका. पन्नास वर्षे आम्ही हेच राजकारण करत आलो आहोत. तुम्ही आमच्या सानिध्यात या.’

खासदार विखे या वादग्रस्त विधानांमुळे ट्रोल झाले आहेत. या अगोदरही अनेक विधानामुळे सुजय विखे ट्रोल झाले होते.

Visit : Policenama.com