MP Sujay Vikhe-Patil | “शिवसेनेचा गेम राष्ट्रवादीनेच केला; मुख्यमंत्र्यांनी षडयंत्र ओळखावं” – खासदार सुजय विखे-पाटील

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – MP Sujay Vikhe-Patil | राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) सहावी जागा भाजपने (BJP) जिंकल्यावर महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) एक मोठा धक्का बसला आहे. या निवडणूकीत भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले. खरंतर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) पराभव झाले असल्याने विशेष म्हणजे शिवसेनेला (Shivsena) धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. अशातच भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील (MP Sujay Vikhe-Patil) यांनी मोठा दावा केला आहे. ‘राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेच (NCP) शिवसेनेचा गेम केल्याचा,’ गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

 

सुजय विखे (MP Sujay Vikhe-Patil) म्हणाले, “मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यसभेच्या निकालाबद्दल अपक्षांना दोष देण्यापेक्षा शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे पहावे. या निकालावरून राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार हे माझं भाकीत खरं ठरताना दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीत सुखी आहेत. मात्र, सामान्य शिवसैनिकांसह आमदार, खासदार दु:खी आहेत. येणाऱ्या विधान परिषदेतही शिवसेनेची नामुष्की होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सगळं षडयंत्र ओळखावे. माझ्या आजोबांपासून शिवसेनेशी आमचे संबंध आहेत. त्यामुळे मला शिवसेनेबद्दल सहानुभूती आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पासून सावध राहण्याची गरज असून राष्ट्रवादी हा खेळ करणारा पक्ष आहे,” असं ते म्हणाले.

दरम्यान, “केंद्रीय तपास यंत्रणेच्या दबावामुळे भाजपचा विजय झाल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यावर बोलताना सुजय विखे म्हणाले, “पराभव होतो तेव्हा अनेक कारणं शोधली जातात, असं संजय राऊत स्वत: म्हणतात. त्यामुळे त्यांनी एवढ्या लांब जाण्यापेक्षा राष्ट्रवादीशी चर्चा करायला हवी. त्यांनी असे का केले याचा जाब विचारायला हवा. ते दिलखुलासपणे सांगतील त्यांनी हे का केले. पवार साहेबांनी देखील निकाल धक्कादायक नसल्याची प्रतिक्रिया दिलीय. म्हणजे त्यांना हे अपेक्षित होतं याचा विचार शिवसेनेनंं करणे आवश्यक असल्याचं,” ते म्हणाले.

 

बाळासाहेब थोरातांना टोला –
“महसूलमंत्र्यांचे बदल्यांमध्ये आणि वाळूच्या ठेक्यात गणित पक्कं आहे. त्यांना वाटलं राज्यसभेचं गणितही तसंच आहे.
त्यामुळे आता महसूलमंत्री कन्फ्यूज झाले. राजकारणाचं आणि बदल्यांचे गणित वेगळे असते.
20 तारखेला विधान परिषद निवडणुकीत गणिताची ते सुधारणा करतील,” असा टोला सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांना (Balasaheb Thorat) लगावला.

 

Web Title :- MP Sujay Vikhe-Patil | ncp betrayed shivsena in rajya sabha election 2022 says bjp mp sujay vikhe patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा