MP Supriya Sule | मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यातील 24 गावच्या वाड्या वस्त्यांवर विजेसाठी 12 कोटी मंजूर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) मुळशी (Mulshi Taluka), वेल्हे (Velhe Taluka) आणि हवेली (Haveli Taluka) या तीन तालुक्यांतील एकूण 24 गावांलगतच्या वाड्या – वस्त्यांवर वीज पुरवठा (Power Supply) करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून (District Planning Committee) 12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या सततच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Guardian Minister Ajit Pawar) यांचे विशेष आभार मानले आहेत.

 

मुळशी आणि वेल्हे तालुक्यातील विशेषत: डोंगराळ व दुर्गम गावांत विजेचे प्रश्न असून ते सोडवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यानुसार मंजूर करण्यात आलेल्या बारा कोटी निधीमधून मुळशी तालुक्यातील वेगरे, कोंदूर, मोसे – दादवली, अडमाळ – पासलकर वस्ती, वांजळे – रामवाडी, जताडे – कुडलेवस्ती, पोमगाव – कातर वस्ती या सात ठिकाणी तसेच वेल्हे तालुक्यातील धिसर – ढेबेवस्ती, धानेप – धनगरवस्ती, घावर – घावरवाडीवस्ती, भागीनघर – वाडीवस्ती, भट्टी – वाघदरा – ढेबेवस्ती, सुरवड – वाडीवस्ती, माणगाव – कुंभतलवस्ती, रुळे – काळूबाईचा वाडा, शिरकोली – घरकूलवस्ती, कुरण – मोरेवस्ती, खामगाव – तळजाईवस्ती, वरोती – जननीमाता मंदिर, कोंढवली – स्मशानभूमी, केतकावणे – स्मशानभूमी, दादवडी – वस्ती, वरघड – बिरोबावाडी या सोळा ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे.

या दोन तालुक्यांबरोबरच हवेली तालुक्यातील आगळंबे येथे असलेल्या ठाकरवाडी (Thakarwadi) – धनगरवाडा (Dhangarwada) या ठिकाणीही विजेची आवश्यकता आहे. येथेही लवकरच वीजपुरवठा करण्यात येईल असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. वरील सर्व 24 गावांलगतच्या वाड्या वस्त्या तसेच मंदिर (Temple) आणि स्मशानभूमीला (crematorium) वीजपुरवठा करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याबाबत सुळे या अनेक वेळा पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेटी घेऊन लक्षात आणून देत होत्या. त्यासाठी निधीची मागणी करत होत्या. त्यानुसार त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीमधून खास बाब म्हणून बारा कोटींचा निधी उपलब्ध (Fund Available) करून दिला आहे. या निधीतून लवकरात लवकर या सर्व ठिकाणी वीजपुरवठा होणार असून तेथील अंधार दूर होणार आहे. त्यासाठी सुळे यांनी अजित पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

 

 

Web Title :- MP Supriya Sule | 12 crore sanctioned for electricity in 24 villages of Mulshi Velhe Haveli taluka

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा