‘मी स्वतः उमेदवार आहे, असं समजून आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा : खा. सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पदवीधर निवडणुकीत माझा पक्ष, माझी जबाबदारी या भूमिकेतून काम करून मी स्वतः उमेदवार आहे, असे समजून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (mp-supriya-sule) यांनी केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ वाघोली (ता. हवेली) येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रकाश म्हस्के, माणिक सातव, वैशाली नागवडे, डॉ. वर्षा शिवले, हेमलता बढे आदी उपस्थित होते.

यावेळी खासदास सुळे म्हणाल्या, आघाडी सरकारने वर्षभरात य़शस्वी कामगिरी करत जनतेची मोठी सेवा केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासारखे मंत्री तर आपल्या उल्लेखनिय कामातून राज्यभरात परिचित झाले आहेत. आघाडीचे उमेदवार सुशिक्षित, अभ्यासू आणि जनतेचे प्रश्न मांडणारे असून त्यांनाच विजयी करा, असे त्या म्हणाल्या. आमदार अशोक पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने भक्कमपणे एकजूटीचे बळ दाखवल्यास उत्तुंग यश अवघड नाही. तर आमदार संजय जगताप यांनीही मतदारांना आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

सेनेच्या अध्यक्षाला खोकला…
प्रचारसभेला आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा पदाधिकारी गैरहजर असल्याने खा. सुळे यांनी नाव न घेता कोणी नाही आले तरी मुख्यमंत्री सोबत असल्याने काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगत सेनेच्या अध्यक्षाला खोकला असल्याने ते येऊ शकले नाहीत, असे स्पष्ट केले.

You might also like