सफाई कर्मचाऱ्याला सन्मान देत खासदार सुप्रिया सुळेंनी साजरा केला ‘प्रजासत्ताक दिन’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतात प्रजासत्ताक लोकशाही व्यवस्था अवलंबली आहे. या व्यवस्थेत प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो, या प्रत्येक घटकाला सन्मान देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. आज भारतीय प्रजासत्ताकच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी सफाई कर्मचारी कदम यांच्यासोबत फोटो काढून ते करत असलेल्या कामाबाबत आभार व्यक्त केले. तुम्ही आहात म्हणून आम्ही स्वच्छ परिसरात वावरू शकतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या सोशल मीडियावरुन कदम यांचे जाहीर कौतुक केले.

safai-kamgar
safai-kamgar

आजकाल राजकारणात आपल्याला अनेक नेते दिसतात, ज्यांची सामाजिक बांधिलकी जपण्याची गुणवत्ता काही प्रमाणात ढासळली आहे. लोकनेता होण्यासाठी असलेली क्षमता विसरून आपल्या पदाचा गर्व बळगणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र पाच वेळा संसदरत्न पटकाविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची ओळख काहीशी वेगळी आहे. सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात त्या नेहमीच लोकशाहीला केंद्रबिंदू मानत काम करतात.

safai-kamgar
safai-kamgar

सुप्रिया सुळे सोशल मीडिया चांगल्याच सक्रीय आहेत. आपल्या दैनंदिन कामाच्या माहितीसोबतच त्या सामान्य नागरिकांसोबत काढलेले फोटो, त्यांच्यासोबत झालेला संवाद याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असतात. याआधी देखील त्यांनी पिझ्झा डिलिव्हरी बॉय, पोस्टमन, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासमवेत फोटो काढत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. आजही प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी समाजाची सेवा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.