MP Supriya Sule | ‘ED, पाऊस राष्ट्रवादीसाठी ‘लकी’च’

0
79
Supriya Sule ncp leader and mp supriya sule tauts eknath shinde group over cabinet allocation of cm eknath shinde devendra fadnavis government
File Photo

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन MP Supriya Sule | –  आमच्यावर टीका केल्याने जर कोणी मोठं होत असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे. विरोधकांना खोटे आरोप करून प्रसिद्धी मिळत असल्याचा खूप आनंद वाटत आहेत पण कोणी कितीही आरोप करा, कितीही चौकशी लावली तरी काहीही फरक पडणार नाही. ईडी आणि पाऊस या दोन्ही गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेससाठी (NCP) लकीच आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी व्यक्त केले.

चंद्र्पुरमध्ये (Chandrapur) कार्यकर्ता संवाद कार्यक्रमासाठी खासदार सुळे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्या म्हणल्या, काही दिसापासून अनेकांच्या मागे ईडीची चौकशी लावली आहे. त्यातही पवार कुटूंबाकडे अधिक लक्ष दिले जात आहे.
कोणत्याही चौकशींना आम्ही घाबरत नाही. कोणी कितीही चौकशी करू द्या सत्य बाहेर येईलच असे सांगतानाच ओबीसींचे (OBC) प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसींचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
तरीही ओबीसी नेत्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन करावे सर्वानी एकत्रित येऊन ओबीसींचा प्रश्न मार्गी लावू.
महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) चांगले काम करत आहेत. लसीकरणामध्येही महाराष्ट्र आघाडीवर आहे.
लसीकरणच नाही तर प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राला आघाडीवरच न्यायचं आहे असेही सुळे  म्हणाल्या.

मी खासदारच, फडणवीसांना चिमटा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वी आपण आताही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत आहे असे वक्तव्य केले होते.
त्याचाही खासदार सुळे यांनी समाचार घेतला. कोणाला काय वाटते, हे माहीत नाही.
मात्र, मी खासदार आहे आणि मला खासदारच असल्यासारखे वाटते अशा शब्दात सुळेंनी  फडणवीस यांना चिंमटा काढला.

 

Web Title : MP Supriya Sule | ed and rain is lucky for ncp say mp supriya sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shivsena Vs Devendra Fadnavis | भाजपकडून पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर; शिवसेनेची सामनातून टीका

EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी लवकरच खुशखबर ! अकाऊंटमध्ये येणार मोठी रक्कम, जाणून घ्या

Yuvraj Singh | वादग्रस्त चॅटमुळे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग ‘गोत्यात’