खा. सुप्रिया सुळेंचं FB Live, शरद पवार म्हणाले – ‘आयुष्यात पहिल्यांदाच एवढं पाहिलं पाणी’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे काल पक्षाची बैठक संपवून वाय बी चव्हाण सेंटरमधून बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांना वाहत्या पाण्यातून गाडी न्यावी लागली. याळेस सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केले असता, शरद पवार यांनीदेखील दक्षिण मुंबईत एवढे पाणी साचल्याचे कधीच पाहिले नसल्याचे सांगितले.

Posted by Supriya Sule on Wednesday, August 5, 2020

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. या भागात विक्रमी पावसाची नोद झाली असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. ट्रेन बंद पडून अनेक लोक अडकले. बेस्टच्या बसेसही रस्त्यावरच उभ्या राहिल्याचे चित्र आहे. अशातच नेते मंडळींनाही या पावसाचा फटका बसला आहे. दक्षिण मुंबईत वादळ वारा व जोरदार पाऊसमुळे काही ठिकाणी वृक्ष पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, शहीद भगतसिंग मार्ग, महात्मा फुले मंडई, वूड हाऊस मार्ग कुलाबा, बॅकाबे आगार समोर या भागात वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील 12 तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात 215.8 मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये 101.9 मिलीमिटर; तर पश्चिम उपनगरांमध्ये 76.03 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like