‘माझ्या नादी लागू नका’ : खासदार सुप्रिया सुळे

भोर : पोलीसनामा ऑनलाइन – हे सरकार सर्वसामान्य, शेतकरी, नोकरदार आणि तरूणांची फसवणूक करणारे आहे. नोटबंदी आणि कर्जमाफीमध्ये अनेकजण भरडले गेले. ही लोकसभा निवडणुक म्हणजे सत्य-असत्याची लढाई आहे. महिला या खुप संयमी असतात. ज्येष्ठांवर आणि वरिष्ठांवर टीका करू नका. मात्र, अति झाले तर महिला पदर खोचून झाशीच्या राणीचा अवतार धारण करते. तेव्हा कुणी माझ्या नादी लागू नये असा खरमरीत इशारा बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी आणि खासदार सुप्रिया सुळे यांना दिला आहे. त्या भोर येथील वेताळपेळत मतदारांशी बोलत होत्या.

बारामती लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व शरद पवार यांनी केले आहे. ते लक्षात ठेवुन गेल्या 10 वर्षापासुन मी मतदार संघात काम करीत आहे. इतरांशी स्पर्धा न करता मी स्वतःशी स्पर्धा करीत असल्यामुळे मला काम करण्याची संधी मिळत असते. सत्‍तेवर नसताना देखील बारामती मतदार संघात अनेक कामे केली असुन गेल्या पाच वर्षाच्या काळात संसदेत सर्वाधिक जास्त प्रश्‍न विचारले देखील आहेत. यावेळी भोरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, जि.प. सदस्य रणजित शिवतारे, पंचायत समिती सदस्य दमयंती जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Loading...
You might also like