पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Supriya Sule | तातडीने आयोजित करण्यात आलेले विशेष संसदीय अधिवेशन (Parliamentary Session) हे नुकतेच पार पडले आहे. नवीन संसद भवनामध्ये कामकाज सुरु आणि निवडणूकांमध्ये 33 टक्के महिला आरक्षण विधेयक (Womens Reservation Bill) हे दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यामुळे हे अधिवेशन लक्षवेधी ठरले. संसदेच्या या विशेष अधिवेशनानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुण्यातील गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून संसदेमध्ये घडलेल्या घटनांचा खुलासा देखील केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे संसदेतील भावांचा उल्लेख अजित पवार यांना उद्देशून नसल्याचा देखील खुलासा केला आहे. तसेच लोकसभेमध्ये भाजपा खासदार रमेश बिधुरी (BJP MP Ramesh Bidhuri) यांनी सपा खासदार दानिश अली (MP Danish Ali) यांचा अपमानजनक उल्लेख केल्याबद्दल देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. यावेळी देखील विशेष संसदीय अधिवेशनामध्ये सुप्रिया सुळे यांनी केलेले भाषण राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरले. गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांना उद्देशून सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान हे अजित पवारांना (Ajit Pawar) उद्देशून होते अशी जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगली. पण माझे ते विधान अजित पवारांसाठी नव्हते असे स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना दिले आहे.
लोकसभेमध्ये महिला आरक्षणाबद्दल बोलताना अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) म्हणाले की, “भाजपाकडून सर्व पुरुषांना बोलायची संधी दिली जात आहे” यावर अमित शाह यांनी “महिलांच्या मुद्द्यावर फक्त महिलांनीच बोलावं का? पुरुष बोलू शकत नाहीत का? भावांनी बहिणींच्या हिताचा विचार करणं ही देशाची परंपरा आहे”, असे उत्तर दिले होते. त्यावर “बहिणीच्या कल्याणाचा विचार करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात”, असे विधान सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये केले होते. सुप्रिया सुळे यांनी हे विधान अजित पवार यांना उद्देशून केले असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. यावर आता स्पष्टीकरण देत सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) हे अजित पवारांसाठी नसल्याचे सांगितले आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अमित शाह म्हणाले की एका पुरुषानं जर महिला आरक्षणाचं विधेयक आणलं,
तर काय हरकत आहे. जर एखादा भाऊ असं वागत असेल तर काय चूक आहे. मी त्यांना एवढंच म्हटलं की काश्मीर ते कन्याकुमारी सगळेच भाऊ प्रत्येक बहिणीचं हित बघतातच असं नाही. मी तुम्हाला अशी असंख्य उदाहरणं सांगू शकते. त्यामुळे माझं विधान फक्त अमित शाह यांच्या वक्तव्यांबाबत होतं” असा खुलासा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्याचबरोबर संसदेमध्ये भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी सपा खासदार दानिश अली ‘दहशतवादी’ असा उल्लेख केल्यावर सुप्रिया सुळे यांनी कडक शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आहे.
सुप्रिया सुळेंनी सांगितले आहे की, “सरकार दरबारी भाजपाचे खासदार ज्या पद्धतीने शब्द वापरतात, हे दुर्दैवी आहे.
त्या खासदारांच्या विरोधात मी लोकसभा अध्यक्षांना (Lok Sabha Speaker) पत्र पाठवलं आहे.
चांगल्या पद्धतीने कामकाज चाललं. पण त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम भाजपाच्या असंस्कृत खासदाराने केले.
त्यांनी याआधीही अनेकदा अशा गोष्टी केल्या आहेत.
काल कनिमोळी भाषण करायला उभ्या राहताच त्याच खासदारांनी त्यांच्यावर आरडाओरड करायला सुरुवात केली.
भाजपाच्या खासदारांची ही प्रवृत्ती आहे. त्याला भाजपा खतपाणी घालतेय. भाजपाचा दुतोंडी चेहरा इथे दिसतोय”
अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर आणि रमेश बिधुरी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Police News | कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी, पोलिस दलात प्रचंड खळबळ