MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंची भाजपवर बोचरी टीका, म्हणाल्या-‘भाजप आधी पक्ष होता, आता भारतीय जनता लॉन्ड्री झालीय’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. मात्र, यावेळी त्यांनी भाजपचे नावच बदलले आहे. भारतीय जनता पक्ष नाही तर भारतीय जनता लॉन्ड्री (Bharatiya Janata Laundry) असं नामकरण सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केलं आहे. पुण्यातील उरुळी देवाची येथे जनसंवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

 

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, आधी भारतीय जनता पक्ष होता, आता लॉन्ड्री झाली आहे. आमच्या पक्षातून त्यांच्या पक्षात गेलेले आमदार खासदार बोलतात की, भारतीय जनता पार्टीत गेल्यावर क्लिन चिट (Clean Chit) मिळते. म्हणून ही भारतीय जनता पार्टी नसून भारतीय जनता लॉन्ड्री आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.

 

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, भाजपने ज्या नेत्यांवर आरोप केले त्यांनाच पक्षामध्ये घेतलं आणि त्या झालेल्या इनकमिंगबाबत त्यांनी भाजपचे नामकरण केलं आहे.
भाजपमध्ये आधी वैचारिक मतभेद होते. कधी कटूर नव्हती आता भाजपमध्ये त्यांच्या पेक्षा बाहेरचे लोक जास्त गेले आहेत.
भाजपच्या व्यासपीठावर आता मुळचे काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादीचे नेते दिसतात.
त्यांच्याकडे स्वत:चे नेते कुठे दिसतात? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- MP Supriya Sule | ncp mp supriya sule criticised bjp leaders over ncp leaders joined bjp party