MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा; म्हणाल्या – ‘…तर हात तोडून हातात देईन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Supriya Sule | काल पुण्यातील बालगंधर्व सभागृह येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांविरोधात राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाल्याची पहायला मिळत आहे. यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली आहे.

 

”भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारलेलं तुम्ही पाहिलं ? ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे का ? हा शाहू, फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी नेहमी महिलांचा मान – सन्मान केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगते की, आजच्यानंतर जर महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेवर अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वत: तिथे जाईन आणि त्याच्याविरोधात न्यायालयात केस करेन आणि त्याचे हात तोडू.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Web Title :- MP Supriya Sule | NCP MP supriya sule warns against beating of ncp women leaders

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा