MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा महायुतीला खोचक टोला, ”भुजबळांचा हा अपमान, ज्येष्ठे नेत्याचे कॅबिनेटमध्ये ऐकले जात नाही, हे…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – MP Supriya Sule | छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा हा अपमान आहे. इतक्या ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे त्यांच्याच कॅबिनेटमध्ये ऐकले जात नाही. अनेकदा संजय राऊत (Sanjay Raut) जे सांगतात, ते अनेकांना आवडत नाही. परंतु, ते म्हणतात की मंत्रिमंडळात गँगवॉर सुरू आहे. भुजबळ ज्येष्ठ नेते, त्यांच्याबद्दल प्रेम, आदर, विश्वास आहे, ते वडिलांच्या वयाचे आहेत, अशा माननीय आदरणीय छगन भुजबळांवर हा अन्याय होत असेल, तर हे अतिशय दुर्दैवी आहे, असा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी महायुती सरकारला लगावला आहे.

मराठा आरक्षणासंबंधी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील सत्ताधारी नेत्यांमध्ये काहीतरी बिनसल्याचे जाणवत आहे. छगन भुजबळ यांनी तर उघडपणे या निर्णयावर सरकारला विरोध केला असून आज तर त्यांनी मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे. यावरूनच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांचे अंतर्गत काय आहे, ते मला माहिती नाही. पण, छगन भुजबळ यांना सातत्याने ज्या
गोष्टी कॅबिनेटमध्ये मांडता येत नाहीत, त्या त्यांना कॅमेरासमोर येऊन मांडाव्या लागत आहेत. यातच या ट्रिपल इंजिन खोके सरकारचे अपयश आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय आमचे सरकार
आल्यास लगेच घेऊ. आताच्या केंद्र आणि राज्य सरकारने जरी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाच्या
आरक्षणाची मागणी केली, तरी राजकीय विरोधक असूनही पूर्ण सहकार्य करू, बाजूने मतदान करू.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar | मराठा आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांचे महत्वाचे वक्तव्य, ”शिंदे-जरांगेंमधील कराराने २ बळी घेतले, एक भाजपचा अन्…”

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर! म्हणाले, ”पंतप्रधान आवास योजनेत दुजाभाव, ग्रामीण भागावर अन्याय…”