MP Supriya Sule | ‘हम बेवफा हरगीज ना थे, पर…’ सुप्रिया सुळेंचा टोला, म्हणाल्या-‘मला शिंदे गटाची काळजी वाटते’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) गोठवलं. यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटांना आता नवं चिन्ह घ्यावं लागणार आहे. यावर राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आता राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी चित्रपटातील एका गाण्याचा उल्लेख करत सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तसेच हा शिवसेनेवर अन्याय असल्याचे म्हटले आहे.

 

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या, दोन गोष्टी आपण बघू शकतो. हा शिवसेनेवर (Shivsena) अन्याय आहे. यावेळी त्यांनी एका हिंदी गाण्याच्या ओळी म्हणत शिंदेंना टोला लगावला. त्या म्हणाल्या, हम बेवफा हरगीज ना थे, पर हम वफा कर ना सके या ओळी म्हणत त्यांनी म्हटलं की अगोदर अशी घटना झाली आहे. आता हे कटकारस्थान उद्धव ठाकरेंसाठी केलं गेलं आहे. परंतु मला शिंदे गटाचे काळजी वाटते. म्हणूनच त्यांच्यासाठी हे गाणं आठवतं, असंही त्या म्हणाल्या.

या सगळ्या गोष्टीमुळे पक्ष मात्र संपत नसतात. राष्ट्रवादी काँग्रेस पण 2019 ला संपली असं काहीजण म्हणत होते.
पण असे पक्ष संपत नसतात, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही निशाणा साधला.
फडणवीस सगळंच बोलतात ते खरं नसतं. पक्ष बदलल्यावर असं बोललं जातं, राष्ट्रवादीवर आरोप केले जातात, असंही त्या म्हणाल्या.
तसेच उपमुख्यमंत्री यांना विचारा मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे आहेत? मुंबई निवडणूक (Mumbai Election) आता कमळावर लढली जाईल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Web Title :- MP Supriya Sule | ncp supriya sule mocks bjp cm eknath shinde on shivsena election symbol frozen

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | भांडणे करु नको, असे सांगितल्याने मित्रानेच कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ परिसरातील घटना

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्लांची महाराष्ट्रात महत्त्वाच्या पदावर होणार नियुक्ती?

NCP Chief Sharad Pawar | मागील काही दिवस वाचत होतो, ते घडलं, पण…, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया