खा. सुप्रिया सुळेंच्या समोरच पैठणमध्ये राष्ट्रवादीच्या आजी-माजी कार्यकर्त्यांमध्ये ‘राडा’, पक्षांतर्गत ‘धुसफूस’ उघड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आज औरंगाबादच्या पैठणमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या गटात राडा झाला. सुप्रिया सुळे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. पैठणमध्ये राष्ट्रवादीचा एक कार्यक्रम सुरु होता. या दरम्यान दोन गटात मोठा वाद निर्माण झाला, त्यामुळे राष्ट्रवादीची औरंगाबादेतील धुसफूस समोर आली.

कार्यक्रम सुरु असताना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार संजय वाघचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्यात वाद उफाळून आला. यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते गोंधळ घालू लागले. आजी माजी कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला. राष्ट्रवादीत नव्याने प्रवेश केलेल्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला.

दत्ता गोर्डे यांनी नुकताच राष्ट्रवादी प्रवेश केला आहे तर संजय वाघचौरे माजी आमदार आहेत. हा वाद वाढू लागल्याने सुप्रिया सुळेंना मध्यस्थी करावी लागली. या वादाने कार्यक्रम काही काळ रोखण्यात आला होता. या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमातून बाहेर काढले.

परंतु या वादमुळे औरंगाबाद शहरात असलेली दोन गटातील पक्षांतर्गत धुसफूस समोर आली. सुप्रिया सुळेंच्या देखत हा प्रकार घडल्याने पक्ष कार्यकर्त्यांबाबत काय निर्णय घेणार यावर अद्याप प्रश्न चिन्ह आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like