MP Supriya Sule On Pune PMC | ‘महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही कामे होत नाहीत’ ! ‘समस्या न सुटल्यास आंदोलन करणार’; खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Supriya Sule On Pune PMC | पुणे शहरात बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) काही भाग येतो. या भागात पाणी, रस्ते, कचरा प्रकल्प आदी प्रमुख समस्या आहेत. महापालिका आयुक्तांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही काम होत नाहीत. त्यामुळे आता जर आमची कामे नाही झाली तर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना दिला आहे. (MP Supriya Sule On Pune PMC)

बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत शुक्रवारी सुळे यांची पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत बैठक झाली.
त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, “पुणे शहरातील जो भाग माझ्या मतदार संघात येतो त्यात पाणी, रस्ते, कचरा सारखे गंभीर प्रश्न भेडसावत आहेत.
अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री पदावर असताना या कामांना गती देण्याचे काम झाले होते परंतू सत्ता गेल्यानंतर सर्व कामांना स्टे देण्यात आला.
या कामांसंदर्भात दर महिन्याला मनपा आयुक्तांसोबत बैठकीला यावे लागत आहे. वेळोवेळी पाठपुरवा करूनही काम होत नाहीत. आता जर कामांना गती नाही मिळाली तर आम्ही आंदोलन करू” असा इशारा ही सुळे यांनी दिला. (MP Supriya Sule On Pune PMC)

“ती” यंत्रणाच नसल्याने मनपात यावे लागत आहे सुळे म्हणाल्या की, आगोदरच्या पालकमंत्र्यांची अर्थात
अजित पवार यांची बैठक घेण्याची एक पध्दत होती. आठवड्याच्या शुक्रवारी प्रशासनाबरोबर बैठक होती होती.
त्यामुळे आमच्या कामांना गती मिळायची. आता ती यंत्रणाच नसल्याने आम्हाला सतत महापालिका
आयुक्तांकडे यावे लागत आहे. अशा शब्दात सुळे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील
(Guardian Minister Chandrakant Patil) यांच्या वर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

Web Title :MP Supriya Sule On Pune PMC | “Works are not done even after following up with the Municipal Commissioner”! ‘If the problem is not solved, we will protest’; Warning of MP Supriya Sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Caste Issue | खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली? राज्य सरकारने केला खुलासा

Maharashtra Budget Session | सांगलीतील ‘जात’ प्रकारावरुन विधानसभेत खडाजंगी, मविआच्या आक्रमक नेत्यांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल : ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध – खासदार सुप्रिया सुळे