MP Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कोणी काहीही बोलत असेल तर…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रामनवमीच्या (Ram Navami) दिवशी संभाजीनगरमध्ये दंगल झाली, त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती (Hanuman Jayanti) राज्यात दंगली (Riot) घडवण्यासाठीच आहेत की काय, असं वाटायला लागलं आहे. असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सत्ताधारी नेत्यांकडून जोरदार समाचार घेतला जात असून त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी होत आहे. आव्हाड यांच्या विधानावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. सर्वच राजनेत्यांनी ही पद्धत थांबवली पाहिजे, असे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे.

 

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. By Babasaheb Ambedkar) मोकळा श्वास आणि मन मोकळं करायचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जर कोणी काही वक्तव्य केलं असेल तर त्यावर लगेच गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे. सर्वच राजनेत्यांनी ही पद्धत थांबवली पाहिजे. कोणीही काहीही बोललं असेल तर लगेच केस न करता आपण सर्वांनी मिळून तारतम्य बाळगलं पाहिजे, लगेच केस कारण यावर विचार केला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

त्या पुढे म्हणाल्या, दादा मनमोकळेपणाने त्याच्या मनातील गोष्ट खरेपणाने बोलले असतील, त्यात गैर काय? असा प्रतिसवाल त्यांनी विचारला. अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याचा मानस केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
रामनवमीच्या दिवशी संभाजीनगर मध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहेत
की काय, असं वाटायला लागले आहे. खरं तर येणारे वर्ष हे जतीय दंगलीचं वर्ष असेल
कारण सत्ताधारी देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत.
महागाई कमी करु शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्याकडे धार्मिक सोहळे करुन मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही,
असं जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पक्षाच्या शिबिरात म्हटले होते.

 

Web Title :- MP Supriya Sule | ram navami and hanuman jayanti only to create riots in the state supriya sules reaction to jitendra awadas statement she said if anyone has said anything

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dagdusheth Ganpati | दगडूशेठ गणपती : श्री गणेश व देवी शारदा यांचा शारदेश मंगलम् विवाह सोहळा थाटात

PM Kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

Maharashtra Tourism – MTDC | पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन