MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MP Supriya Sule | बावधन बुद्रुक (Bavdhan Budhruk) येथील पेबल्स सोसायटीच्या समोर असलेला पीएमपी बसचा थांबा (PMPML Bus Stop) पूर्ववत सुर करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार पीएमपी प्रशासनाला टॅग करत त्यांनी ही मागणी केली आहे. (MP Supriya Sule)

कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरून निगडी, हिंजवडी आणि वडगाव मावळ कडे धावणाऱ्या पीएमपी बसेस पूर्वी बावधन येथील पेबल्स सोसायटीच्या गेटसमोर थांबत होत्या. त्यांच्यासाठी जुनी डीएसके टोयोटा शोरूम हा अधिकृत थांबा होता. तो थांबा अचानक बंद करण्यात आल्यामुळे येथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून तो थांबा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (MP Supriya Sule)

निगडी, हिंजवडी आणि वडगाव मावळकडे जाणाऱ्या अनुक्रमे ४३, ४४ आणि २२८ या क्रमांकाच्या पीएमपीएमएलच्या बससाठी या थांब्यावर अनेक प्रवासी बसची वाट पहात थांबलेले असतात. अचानक तो बंद करण्यात आल्याने प्रवाशांना मागील किंवा पुढील बस थांब्यापर्यंत चालत जावे लागत आहे. ऐन कामाच्या वेळी हे चालत जाणे वेळखाऊ होते परिणामी कामावर किंवा शाळा महाविद्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होणे आदी गोष्टींमुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

हा थांबा पुर्ववत करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करुनही त्याची योग्य दखल घेतली जात नाही. येथे स्टॉपचा बोर्ड लावण्यात आला नाही. नागरीकांना बससाठी किमान एक किलोमीटर अंतर चालून पुढच्या स्टॉपपर्यंत जावं लागतं. हा मार्ग आणि बस बाणेर, निगडी, चिंचवड आणि हिंजवडी येथे जाणारे प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय उपयोगी आहे. नागरीकांची सोय लक्षात घेता वरील ठिकाणी सदर गाड्यांचा थांबा पुर्ववत करावा, असे सुळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

Web Title : MP Supriya Sule | Re-start Pebbles Society stop at Bawdhan of PMP Bus – Kha. Sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chandrakant Patil On Maharashtra Budget 2023 | राज्याला अधिक समृद्ध करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प ! उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 13 हजार 613 कोटी 35 लाखांची भरीव तरतुद – चंद्रकांत पाटील

Ravindra Dhangekar | शपथविधीपूर्वी रवींद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना नमस्कार, ‘हु इज धंगेकर’च्या घोषणांनी सभागृह दणाणले