
MP Supriya Sule Shares Photo Of Balasaheb Thackeray & Sharad Pawar | ठाकरे – पवारांवरील जनतेचे प्रेम भाजपाला बघवत नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल; म्हणाल्या – ‘कटकारस्थाने करून…’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- MP Supriya Sule Shares Photo Of Balasaheb Thackeray & Sharad Pawar | महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे. लोकशाही व्यवस्थेत अत्यावश्यक असणारी विरोधी पक्षांची आणि विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केला आहे. या ट्विटसोबत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा फोटो शेअर केला आहे. (MP Supriya Sule Shares Photo Of Balasaheb Thackeray & Sharad Pawar)
भाजपाने केंद्रीय यंत्रणा तसेच पैशाच्या बळावर शिवसेना पक्षात उभी फूट पाडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले केली, या सूडाच्या राजकारणावर सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (MP Supriya Sule Shares Photo Of Balasaheb Thackeray & Sharad Pawar)
सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण ‘मराठी माणूस’ अशी मराठी माणसाची व्याख्या केली होती. महाराष्ट्रीय माणसांनी प्रचंड मेहनत करुन, प्रागतिक विचार जोपासत विकसित महाराष्ट्राची उभारणी केली. अनेक क्षेत्रात देशाला दिशा दाखविण्याचे काम केले.
पण केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने येनकेनप्रकारे मराठी माणसांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष विधिनिषेध शून्य मार्गांनी फोडले.
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, स्व. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली. त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करुन ती देशभरात पोहोचविण्याचे काम केले.
या दोन्ही नेत्यांनी आपल्या कुटुंबाचा समाजकार्याचा वारसा घेऊन प्रचंड मेहनतीने डोंगराएवढे कार्य उभे केले व देशभरात
दबदबा निर्माण केला. गेली साठ वर्षे या दोन्ही नेत्यांचे विचार आणि नेतृत्व मान्य करुन लाखो कार्यकत्र्यांनी हे पक्ष उभे केले. याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ॠणात आहोत.
देशातील व महाराष्ट्रातील मायबाप जनतेने स्व. बाळासाहेब ठाकरे व आदरणीय पवार साहेबांना भरभरून प्रेम दिले.
पण त्यांची ही ताकद व हे प्रेम भाजपला बघवत नाही.
सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, आदरणीय पवार साहेबांनी तीन वेळा कर्करोगाशी झुंज दिली.
प्रत्येक वेळी ते जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद यांच्या बळावर जनसेवेसाठी बरे होऊन पुन्हा कामाला लागले.
यासाठी माय-बाप जनतेचे आम्ही कायम ऋणी आहोत.
महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने
करून संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे. त्यासाठी केंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातोय,
पाण्यासारखा पैसा ओतला जातोय.
भाजपावर आरोप करताना त्यांनी शेवटी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील जनतेमध्ये आपापसात भांडणे लावून, त्यांची
ताकद खच्ची करून भाजपला आनंद मिळतो, परंतू या तत्वशून्य फोडाफोडीतून राज्याची प्रतिमा मालिन करण्याचे
पाप भाजप करत आहे. लोकशाही व्यवस्थेत अत्यावश्यक असणारी विरोधी पक्षांची आणि विचारांची ‘स्पेस’ भाजपाला
मान्य नाही, हेच सातत्याने अधोरेखित होते आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rohit Pawar | शरद पवार व गौतम अदानी भेटीवर रोहित पवारांनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले…