कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक म्हणावे, असे वक्तव्य केले होते. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते की स्वराज्यरक्षक यावरुन राज्यात वाद पेटला आहे. यावर खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी एक व्हिडीओ शेअर करत अजित पवार यांची पाठराखण केली. आता राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील अजित पवारांची पाठराखण केली आहे. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे दादा पाटील महाविद्यालयात (Dada Patil College) कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत विचारण्यात आले. यावर बोलताना त्या म्हणाल्या, अजित पवारांनी कोणाचाही अपमान केलेला नाही, दादा नेमकं काय म्हणालेत हे कुणीतरी दोन मिनिटं शांतपणे ऐकून घेतलं तर त्यात दादांच्या मनात कुठल्याही प्रकारे अपमान करण्याची भावना नसल्याचं दिसतं. स्वत:कडे कुठलाही विषय नसल्याने आणि स्वत:चं अपयश झाकण्यासाठी भाजप हे अजित पवारांवर असे आरोप करुन आंदोलन करत असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार यांची पाठराखण केली.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच…
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. परंतु एखादं वक्तव्य झाले असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन चर्चा होऊ शकते. आज देशापुढे महागाई, बेरोजगारी यासारखी मोठी आव्हाने आहेत. आंदोलने करण्याचा भाजपला अधिकार आहे, परंतु ज्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार महागाई, बेरोजगारी बद्दल बोलतात तेव्हा भाजपने रस्त्यावर आमच्यासोबत आंदोलनात उतरावं.
देशातील सर्वच नेत्यांचे बारामतीत स्वागत
बारामतीमध्ये येऊन पवार कुटुंबाचा करेक्ट कार्यक्रम करु असे काहीजण म्हणत आहेत.
यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, कुणालाही कुठेही जाऊन लढण्याचा अधिकार आहे.
त्यांचं बारामतीमध्ये स्वागत आहे, देशातील सर्वच नेते बारामतीत आले तरी मी त्यांचे स्वागत करते.
त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी बारामतीत येऊन केलेली कामे पाहावीत असंही सुळे म्हणाल्या.
Web Title :- MP Supriya Sule | supriya sule criticize bjp leaders over ajit pawars statement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update