MP Supriya Sule | ‘…अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल’- सुप्रिया सुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सवाल उपस्थित केले आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकारमधील पक्षाचे असल्यामुळे त्यांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) विचारला आहे. तसेच त्यांच्यावर अद्याप गुन्हा (FIR) दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टॅग केले आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंग (Molestation) अथवा सायबर क्राईमच्या (Cyber Crime) तक्रारींवर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशिल असल्याचा संदेश जाईल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरिणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली
मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण,
शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी
तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो.

त्यातही बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य
असेल तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे.
संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का?
त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे.

आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंग अथवा सायबर क्राईम असो महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे.
अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल.
तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपण याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Web Title :-   MP Supriya Sule | supriya sule criticized shinde fadnavis government after sanjay shirsat statement on sushma andhare

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC – Mahavitaran – MahaPreit | महापालिका आणि महाप्रीतच्या व्यवहारात मोठी आर्थिक अनियमीतता ! वीज पुरवठा दरात महापालिकेची फसवणूक झाल्याचा संशय

Belly Fat | पोटाची चरबी कमी करायची असेल तर करू नका ‘ही’ गोष्ट; जाणून घ्या

Pune Crime News | 50 हजारांवर अडीच लाख परत केल्यानंतरही 55 हजारांची मागणी करुन धमकाविणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल, चंदननगर पोलीस ठाण्यात FIR

Maharashtra Politics News | निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केले, शिंदे गटाच्या नेत्या खळबळजनक गौप्यस्फोट