MP Supriya Sule | अजित पवारांना मुख्यमंत्री करा, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांना ‘ऑफर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वेदांता समूह (Vedanta Group) आणि फॉक्सकॉन कंपनीचा (Foxconn Company) प्रकल्प गुजरातला वळवण्यावरुन राष्ट्रवादी पक्ष (NCP) आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या नेतृत्वात आज पुण्यात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात (Shinde-Fadnavis Government) आंदोलन केले. 1 लाख 66 हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला वळवल्यावरुन सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी घरगुती दौरे बंद करावेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करावं, असा टोला त्यांनी लगावला.

 

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी याहून मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या आश्वासनचाही सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी समाचार घेतला. मी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देते की, त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं, आम्ही त्यांना केंद्रात मोठं पद देऊ, असा उपरोधक टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना आव्हान करताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, वेदांता कंपनी गुजरातला जाण,
हा राजकारणाचा विषय नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे.
त्यामुळे माझी सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी एकत्र यावं आणि सर्वांनी एकत्रितपणे केंद्र सरकारला विनंती करावी,
ही गुंतवणूक महाराष्ट्राला ऑन मेटील मिळाली आहे, ती ऑन मेरीटच राहिली पाहिजे.

 

दरम्यान, सर्व राज्यांमध्ये आमचे लोक गेले. केपीएमजी, आमची फॉक्सकॉनचीही टीम गेली.
त्यांनी गुजरातला पसंती दिली. कोणत्याही परिस्थितीत असं समजू नका की हे सर्व नरेंद्र मोदींनी केलं आहे.
आमच्या इंडिपेंडेंट एजेंसीने (Independent Agency) असं ठरवलं की गुजारातच असं एक राज्य आहे ज्याने
सिलिकॉन पॉलिसी (Silicon Policy) सर्वात पहिले सुरु केली आहे, असे अनिल अग्रवाल (Anil Aggarwal) यांनी सांगितले.

 

Web Title :- MP Supriya Sule | supriya sule offer eknath shinde ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | वारजे माळवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 21 जण ताब्यात

Bad Cholesterol | ‘ही’ एक गोष्ट खाल्ल्याने नसांमध्ये जमणार नाही ‘बॅड कोलेस्ट्रॉल’, आजपासून खायला करा सुरूवात

Irrigation Department | राज्यातील धरणांच्या जलाशयांच्या परिसरात 200 मीटर अंतरात पक्क्या बांधकामांना बंदी – पाटबंधारे विभाग