MP Supriya Sule । सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा; म्हणाल्या – एजन्सीचा गैरवापर हे त्यांचं ‘स्टाईल ऑफ ऑपरेशन’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Supriya Sule । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील निवसस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज छापेमारी केली, यावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकास आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. ‘एजन्सीचा गैरवापर हे त्यांचं स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसतं आहे. अशा शब्दात खा. सुळे (MP Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्या पुण्यात माध्यमाशी बोलत होत्या.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
माध्यमाशी बोलताना सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटलं आहे की, ‘मागील अनेक वर्षात त्यांची सत्ता आल्यापासून आम्ही जवळून पाहिलेलं आहे. शरद पवारांना देखील ईडीची नोटीस पाठवली गेली होती, त्यामुळे हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. असं सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) म्हटलं आहे. पुढे त्या म्हणाल्या, ‘राजकारण हे विचाराचं असतं, लोकांच्या सवेसाठी असतं. मी आजपर्यंत या देशात एजन्सींचा वापर, आपल्या विरोधकांच्या विरोधात मी तरी कधी पाहिलेला नाही.

पुढे खा. सुळे म्हणाल्या, ‘एक गोष्ट सांगू इच्छिते महाराष्ट्राची संस्कृती आहे,
की कधीही सत्तेचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी केला गेला नाही.
नेहमी विचारांचं राजकारण, जे काही विरोध होतात, मतभेद होते ते वैचारिक होते.
यामध्ये एजन्सीचा वापर मी तरी कधी पाहिलेला नाही.
ही नवीन एसओपी (SOP) ज्याला म्हणतात, ऑपरेटींग स्टाईल त्यांनी काढलेली आहे,
हे जाणीवपूर्वक केलं जात असल्याचं दिसतंय.
तसेच, एखादा मोठा पक्ष या देशात करोना, बेरोजगारी आरोग्याच्या एवढ्या अडचणी असताना, सूडाचं राजकारण करतोय, हे अतिशय दुर्दैवी असल्याचं खा. सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटलं आहे.

आमचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे,
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आता राज्याच्या समस्त जनतेची सेवा करण्यात आणि करोनामधून बाहेर पडण्यासाठी सगळेच व्यस्त आहेत. तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा सुरु आहे,
ती लाट लहान मुलांमध्ये येईल असं केंद्र सरकार (Central Government) सातत्याने सांगत आहे.
आता पूर्णवेळ महाविकास आघाडी तिसरी लाट कशी येणार नाही अथवा त्याच्या तयारीसाठी व्यस्त आहे. लोकांची सेवा करण्यासाठी महाविकास आघाडी झाली आहे.
वैयक्तिक सूड घेण्याचं आमचं धोरण कधीही नव्हतं आणि कधीही असणार नाही.
असं देखील सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी यावेळी संगितलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : mp supriya sule | the misuse of the system seems to be their style of operation supriya sule targets bjp

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील आढावा बैठक अजित पवारांच्या अनुपस्थितीत; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Pune Crime Branch Police | वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, स्वतःच्या सोसायटीच्या पार्किंगमधूनही…

Sanjay Raut । भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांसंबंधी झालेल्या ‘त्या’ ठरावावरुन संजय राऊत भडकले, म्हणाले..