MP Supriya Sule | बारसुतील व्हिडिओ शेअर करत खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला केली विनंती, म्हणाल्या – ‘कोणताही प्रकल्प बळजबरीने…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बारसूतील रिफायनरी प्रकल्पाचा (Barsu Refinery Project) विरोध वाढत आहे. सरकारने (State Government) जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जचा विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनीही बारसू येथील एक व्हिडिओ ट्विट करुन सरकारवर टीका केली आहे. तसेच स्थानिकांवर कोणताही प्रकल्प बळजबरीने लादण्याच प्रयत्न करु नये, असे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे.

 

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कोकणातील बारसू रिफायनरीच्या विरोधात तेथील स्थानिक नागरीकांनी आंदोलनाची भूमिका घेतली असताना त्यांच्यावर राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करीत आहे. पोलिसांच्या लाठीमारात काही आंदोलक जखमी झाल्याचे समजते.शासनाने बळाचा वापर करण्यापेक्षा स्थानिक नागरीक व इतर घटकांशी चर्चा करुन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. स्थानिकांवर कोणताही प्रकल्प बळजबरीने लादण्याचा प्रयत्न करु नये.स्थानिकांचे म्हणणे विचारात न घेणे हे योग्य नाही. याबाबत मंत्रीमंडळातील सदस्यांनी एकत्र बसून तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे.

तर प्रकल्प करण्यास हरकत नाही – अजित पवार

एनरॉनलाही (Enron Project) राजकीय विरोध झाला होता, पवार साहेब मुख्यमंत्री असताना विरोध झाला, पण नंतर युती सरकारने तो प्रकल्प केला. राजन साळवींचं (Rajan Salvi) वक्तव्य ऐकलं त्यांचा पाठिंबा आहे. त्या भागातल्या पर्यावरणाला कुठलाही फरक पडणार नसेल, तर गैरसमज दूर करुन प्रकल्प करण्यास काही हरकत नाही, अशी भूमिका अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडली.

 

70 टक्के लोकांचे समर्थन

हे सर्व भूमिपूत्र असून गावकरी आहेत. त्यांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प, त्यांच्यावर अन्याय करुन पुढे न्यायचा नाही, अशी भूमिका सरकारची आहे. 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचे समर्थन आहे. काही लोक स्थानिक होते, काही बाहेरचे लोक होते, अशी माहिती मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणतंही काम जबरदस्तीने होणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले.

Web Title :-  MP Supriya Sule | video-sharing-that-video-from-barsu-supriya-sules-request-to-the-government-said-rather-than-using-force

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 55 लाखाच्या 162 दुचाकी जप्त,
17 जणांना अटक (Video)

Barsu Refinery Project | बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांचे चर्चेचे आवाहन, मात्र ग्रामस्थांनी फिरवली पाठ

TDM Marathi Movie | पैसावसूल ! रोमान्स, ऍक्शन अन् कॉमेडीचा तडका असलेला ‘टीडीएम’ प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने पाहावाच