वेळ सकाळी 6 वाजता : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी खासदार उदयनराजे नतमस्तक; समाधी स्थळाचे दर्शन घेऊन केले अभिवादन

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त खासदार छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी बलिदानस्थळाचे दर्शन घेतले. पुणे जिल्ह्यात वढू बुद्रुक येथे असलेल्या छञपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी छत्रपती उदयनराजे भोसले नतमस्तक झाले. 

राज्यसभा खासदार असलेले छत्रपती उदयनराजे भोसले सकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळी दाखल झाले. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर उदयनराजेंनी समाधी स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आला होता.