खासदार उदनयराजे यांचा 007 वरून हटके अंदाज, सोशल मीडियावर शेअर

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार उदयनराजे हे आपल्या खास स्टाईलमुळे तरूणाईत प्रसिद्ध आहेत. राजकारण, समाजकारण असो त्याच्या हटके अंदाज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. व्हाट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टि्वटरवर उदयनराजेंचे फॅालोवर्सची संख्या वाढतच आहे. काल आपल्या कार्यक्रत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी उदयनराजे यांनी बुलेट सवारी केली.

काल एक कार्यकर्ता जलमंदिर पॅलेस येथे त्याची स्वत:ची नवी गाडी घेऊन आला होता. राजेंना त्याने गाडी दाखविली. राजेंनी त्यांची ही गाडी चालवून पाहावी असा त्याने आग्रह धरला. कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करत राजे बाईकवर स्वार झाले. जलमंदिर पॅलेसपासून ते नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावापर्यंत त्यांनी दोन राऊंड वेगाने मारले. उदयनराजेंच्या या हटके अंदाजाला अनेकांनी दाद देत हा अंदाज सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला अनेक तरूणांना लाईक केलं आहे.

खासदार उदयनराजेंच्या गाडीचा 007 हा क्रमांक तर तरुणाईला खूप आवडतो. अनेकांनी आपल्या गाडीवर हा क्रमांक लिहून “एकच साहेब महाराज साहेब” अशा प्रकारचे स्लोगन बनवले आहेत. खासदार उदयनराजेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजेंची बुलेट सवारी करत आपला खासदारकीचा उमेदवारी अर्ज भरला होता. याची समाज माध्यमांवर खूपच चर्चा झाली.

You might also like