MP Udayanraje Bhosale | उदयनराजे भडकले; म्हणाले – ‘काय…येड्या सारखं बोलताय’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन  –  MP Udayanraje Bhosale | आपल्या रोख ठोक भुमिकेमुळे उदयनराजे नेहमीच चर्चेत असतात. सध्या सातारा जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांनी वार्तालाप केला. दरम्यान यावेळी चर्चा सुरु असताना एका पत्रकाराने राजकीय दबावाला बळी पडून जिल्हा बँकेनं जरंडेश्वरला कर्ज वाटप केलंय असं आपणाला म्हणायचं आहे असा प्रश्न उपस्थित करताच उदयनराजे (MP Udayanraje Bhosale) भडकले.  ते म्हणाले, काय…येड्या सारखं बोलताय. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तुम्ही. प्रश्न विचारताना भान ठेवा. आम्ही जे बोलतो ते लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवता. त्यामुळे उदयनराजे किती खरे आणि किती खोटे हे तुम्हीच लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे.अन्यथा, बँकेतील शेतकरी सभासद देशोधडीला लागतील, असा इशाराच त्यांनी दिला.

 

उदयनराजे म्हणाले की, कर्ज वाटपाबाबत अनियमितता आहे कि नाही हे माहिती नाही. पण मला माहित असत तर शेपूट घालून बसणार नाही. मी उघडपणे सर्व काही सांगितलं असत. मी तत्व जपली असून तत्वाला गालबोट लावून घेणार मी नाही. समजा जरंडेश्वरच्या कर्जाची वसुली निघाली तर सगळे म्हणणार की हे ही भ्रष्ट आहेत. माझं म्हणणं आहे की, या सर्व लोकांचं १० वर्षाचं रेकॉर्ड बघावं त्यावरून लक्षात येईल कोण कसं वागलं. काही झालं की उदयनराजेंकडे (MP Udayanraje Bhosale) येतात. न्याय मागतात. मी दबाव टाकतो का,  मी समाजाच्या ‘पे स्केल’वर आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

शिवेंद्रराजेंना आव्हान

 

राजघराण्याची मला जण आहे. हे जिल्हा बँकेत निवडून जातात ते चालत. पण आम्ही निवडून गेलो की जागा अडवली म्हणतात. सहकारी संस्था ज्यांनी-ज्यांनी मोडीत काढल्या त्यांनी येत्या १० तारखेच्या आत आपले अर्ज मागे घ्यावेत. तसं झालं तर माझी सपशेल माघार असेल, असं आव्हानही त्यांनी शिवेंद्रराजेंना दिल आहे.

 

Web Title : MP Udayanraje Bhosale | mp udayanraje bhosale was angry with the journalists in satara said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn Money | तुमच्याकडे असेल 1 रुपयाची ‘ही’ Note, तर तुम्हाला मिळतील 5 लाखापेक्षा जास्त, जाणून घ्या काय करावे?

Ration | रेशन कार्डवाल्यांना मोफत धान्यासह आता Free मिळेल ‘डाळ’, ‘तेल’ आणि ‘मीठ’ ! जाणून घ्या सरकारचा प्लान

Pune Crime | घरातून निघून गेलेल्या पत्नीला शोधणार्‍या पतीला चोर समजून बेदम मारहाण; चांदणी चौकातील घटना