MP Udayanraje Bhosale | हा निर्लज्जपणाचा कळस, राजघराण्यावर बोलताना थोडी लाज राखा; उदयनराजेंनी संजय राऊतांना सुनावलं (व्हिडिओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – संजय राऊत (Sanjay Raut) यांची विकृती इथपर्यंत पोहोचली की त्यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले. सत्तेत राहण्यासाठी ही विकृती लोक पाहिजे ते बरळत असतात. त्यांचे हे विधान म्हणजे राजकीय स्वार्थासाठीच केलेले विधान आहे. त्यांचा हा निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. प्रत्येक वेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे, त्यांच्याविषयी बोलताना थोडी लाज तरी राखा, अशा शब्दांत खासदार उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) राऊतांना सुनावलं. छत्रपतींचा आदर अनादर करण्याचा कोणाचा घास नाही, असे उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी ठणकावून सांगितले.

 

 

 

शुक्रवारी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसेनेचा शिवगर्जना मेळावा साताऱ्यातील पालिकेच्या शाहू कला मंदिरात झाला. त्यावेळी छत्रपतींचे वंशज आज ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर नाही. सातारचे प्रतापसिंह महाराज (Pratap Singh Maharaj) कधी झुकले नाहीत. पण, त्यांच्या वंशजांनी भाजपशी (BJP) तडजोड केली, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) म्हणाले,
विकृत स्वभावामुळे राऊतांकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जाते. ही विकृती वाढत चालली आहे.
राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून घेऊन वक्तव्य केलं पाहिजे.
मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्व देखील देत नाही.
आमच्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा, जरा तरी लाज बाळगा,
अशा शब्दात उदयनराजे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.

 

 

Web Title :- MP Udayanraje Bhosale | udyanraje bhosale answer shivsena sanjay raut over criticism shivgarjana melava

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा