Coronavirus : ‘कोरोना’ विरोधातील लढयात खा. उदयनराजे मैदानात

सातारा  :  पोलीसनामा ऑनलाइन  –   बरेच दिवस प्रकाशझोतात नसलेले उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उदयनराजेंनी त्यांच्या खास शैलीत साताऱ्यातील कोरोनाविरोधातील अंलबजावणीत लक्ष घातले आहे . साताऱ्यातील जलमंदिर येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून कोरोनाबतच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती उदयनराजेंनी घेतली त्याचबरोबर कोरोनाविरोधी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला पाचारण करून त्यांनी संवाद साधला. तसेच कोरोनाच्या धर्तीवर साताऱ्यातील गोरगरीब जनतेला मदत वाटपाचे काम देखील उदयनराजे यांनी सुरु केले आहे. साताऱ्यातील जनतेला उदयनराजे कोरोना बरोबर लढण्यासाठी आवाहन करत आहेत.

अद्याप तरी साताऱ्यात कोरोनाने शिरकाव केला नाही, परंतु त्याआधीच सावध पवित्रा उदयनराजे आपल्या साताऱ्यासाठी उचलताना दिसत आहे. नुकतेच उदयनराजे हे राज्यसभेवर खासदार म्हणून पुन्हा निवडून आले, मात्र कोरोनाचे देशभर सावट असल्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंनी सेलिब्रेशन केले नाही. कोरोना संपल्यावर आता हे सेलिब्रेशन होतं कि नाही आणि झालाच तर ते कस असेल हे बघणे देखील औत्सुक्याचे असेल.