‘लढाई रयतेच्या विकासासाठी फक्‍त’ म्हणत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंची भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – अखेर उदयनराजे भोसले यांनी आज अधिकृतपणे स्पष्ट केले की आपण भाजप प्रवेश करणार आहे. ही माहिती त्यांनी ट्विटरवरुन देत सांगितले की, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आपण उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून चघळत असलेला उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या विषयावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

ट्विट करुन उदयनराजे भोसले यांनी ही माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.

याआधीच चर्चा सुरु झाली की, उदयनराजे भाजप प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी लगेचच 15 सप्टेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महाजनादेश यात्रेत उतरणार करणार आहे.

उदयराजे राजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत असताना गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीच उदयनराजेंची भेट घेतली होती. शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर ही भेट उदयनराजेंच्या मनधरणीसाठी असल्याची चर्चा सुरु झाली. यावेळी शरद पवार यांनी उदयनराजेंशी चर्चा देखील केली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

उदयनराजेंनी भाजप प्रवेश करु नये यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदयनराजेंची भेट घेत त्यांना राष्ट्रवादी सोडू नका अशी विनंती केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –