तरूण करू लागला नागासारख्या ‘हालचाली’, म्हणाला – 12 वाजता घेऊन जाईल ‘नागीन’, अनेक तास चालला अफवांचा खेळ

इंदौर : मध्यप्रदेशच्या उमरिया जिल्ह्यात एक अजब प्रकरण समोर आले आहे. येथे एक तरूण नागासारख्या हालचाली करताना आढळला. कधी तो फुत्कार सोडत होता, तर कधी नागासारखा पोटावर वळवळत सरपटत होता. एवढेच नव्हे, तरूण नाग बनल्याची अफवा इतक्या वेगाने पसरली की त्याला पहाण्यासाठी आजूबाजूच्या गावातील हजारो लोक याठिकाणी जमले होते.

हे प्रकरण बांधवगढ टायगर रिझर्व्हलगतच्या सेजवाही गावातील आहे. जेथे ग्रामस्थांमध्ये पसरलेल्या अफवेनुसार, सेजवाहीच्या आदिवासी कुटुंबाच्या घरात एक दिवस अगोदरच एक नागीन येऊन बसली आहे. नागीन त्या घरात आल्यानंतरच त्या घरातील मुलगा मुन्ना नागाप्रमाणे हरकती करू लागला. त्याच्यात सापाचा आत्मा आला आणि तो फुत्कार सोडत आहे, असे सांगितले जात होते. एवढे नाही, तर तरूणाने घोषणा केली की तो 12 वाजता गायब होईल आणि नागीन त्याला घेऊन जाईल.

हीच अफवा पाहण्यासाठी हजारो ग्रामस्थ जमले, परंतु 12 वाजता तरूण गायब न झाल्याने लोक म्हणून लागले याच्यावर नागीन नव्हे तर भुताचे सावट आहे. नंतर मांत्रिकाकडून झाड-फुक सुरू झाली.

झाड-फुक करणार्‍या मांत्रिकाने तरूणाला काठीने मारण्यास सुरूवात केली, तेव्हा त्याचे कथित भूत उतरले आणि तो हातपाय जोडून सर्वांची माफी मागू लागला. मांत्रिकाने सांगितले की, गावाच्या बाहेर नाग-नागीनीचे मंदीर बनवण्याच्या अटीवर भूताने तरूणाचा पिच्छा सोडला आहे.

तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, अनेक तास चाललेल्या या तमाशाची बातमी प्रशासनापर्यंत पोहचलीच नाही. गावचे सरपंच आणि सचिवाने सुद्धा प्रशासनाला कळवले नाही. हजारोच्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांमध्ये सुद्धा कोरोनची भिती जरा सुद्धा दिसून आली नाही. नंतर कलेक्टर संजीव श्रीवास्तव यांनी तरूणावर कलम 188 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सांगितले. या भागात किती मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरलेली आहे, हेच या घटनेवरून दिसून येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like