MP Vinayak Raut | विनायक राऊतांचा राणे पुत्रांना टोला; म्हणाले – ‘टिंगू-मिंगू बडेजाव मारायला लागले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – MP Vinayak Raut | चिपी विमानतळाच्या (chip airport inauguration) उद्घाटनाच्या मुद्द्यावरून एका राजकीय वादाला वेगळंच तोंड फुटलं आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हवेच असं काही नाही, असं भाष्य भाजप नेते (BJP) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) केलं होतं. या मुद्द्यावरुन आता शिवसेना आणि राणेंमधील (Shiv Sena and Rane) वाद पुन्हा चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहे. राणेंच्या वक्तव्यावरुन आता शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी आपली भुमिका व्यक्त केली आहे.

गेल्या सात वर्षांपासून चिपी विमानतळ बांधून तयार होतं. मात्र, वाहतुकीला उपलब्ध नव्हतं. येत्या 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत. याबाबत मंत्री राणे (Union Minister Narayan Rane) यांनी माहिती दिली. तसेच, या सोहळ्याला मुख्यमंत्री असावेच असं काही नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी बाप असावा तर असा असं विधान केलं होतं.

 

 

यावरुन बोलताना विनायक राऊत (MP Vinayak Raut) म्हणाले, टिंगू-मिंगू आहेत ते पण बडेजाव मारायला लागले. बाप असावा तर असा, असं म्हणतात. मात्र, बाप असावा पण आयत्या बिळातला नागोबा असू नये. आयत्या बिळातला नागोबा होऊन तुम्ही श्रेय घेऊ शकत नाही,

पुढे विनायक राऊत म्हणाले, आता जे बडेजाव मारतात ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्र्यांना बोलावणार की नाही? हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला काय अधिकार आहे सांगायचा?
असा सवाल देखील त्यांनी राणेंना केला आहे.
राणेंना माहिती नसेल तर त्यांनी कोणाकडून शिकून घ्यावे.
इतकंच माहिती नसेल तर अमित शाहंना विचारावे, असं देखील विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

Web Title : MP Vinayak Raut | mp vinayak raut criticized rane brother over chipi airport inauguration controversy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Cabinet Decisions | मोदी सरकारच्या ‘या’ मोठ्या निर्णयाने लाखो लोकांना मिळेल रोजगार, जाणून घ्या प्लॅन

Ravet Police Station | देहुरोड पोलीस ठाण्याचे विभाजन करुन रावेत पोलीस स्टेशनच्या निर्मितीस शासनाची मंजुरी

Pune Court | नानासाहेब गायकवाडांच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जीव मारण्याची धमकी देत मर्सिडीज कार नावावर केल्याचं प्रकरण