MP Vinayak Raut | ‘पूर्ण ठाकरे गट असंतुष्ट’, फडणवीसांच्या टीकेला विनायक राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘फडणवीसांनी भाजपला लागलेल्या पनवतीची…’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना संपूर्ण ठाकरे गटच (Thackeray Group) अस्वस्थ असल्याची टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेला खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटाची चिंता फडणवीसांनी करण्याची गरज नाही. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) एकीकडं बोलत आहेत. दुसरीकडं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बोलत आहे. एक ना धड बाराभर चिंध्या तुमच्या चालू आहेत. मिंधे गटाला बरोबर घेतल्यानंतर भाजपला (BJP) लागलेल्या पनवतीची फडणवीसांनी काळजी करावी, असे विनायक राऊत (MP Vinayak Raut) म्हणाले. ते कोल्हापूर येथे बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे. तीन-चार लोकांमुळे तिथे एवढी अस्वस्थता आहे त्याच ठाकरे गटाच्या संदर्भात मी बोलण्यापेक्षा तुम्हाला भविष्यात कळेल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

जागावाटपाबाबत चर्चा नाही

लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाबद्दल महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) कोणतीही चर्चा आणि फॉर्म्युला तयार झाला नाही. शिवसेनेचे (Shivsena) सर्वात जास्त खासदार निवडून आले आहेत. निवडून आलेल्या जागा कायम ठेवत शिल्लक राहिलेल्या जागांचं समान वाटप करायचं, असा फॉर्म्युला आला, तर विचार होऊ शकतो, असं मत विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी मांडलं.

महाराष्ट्रात फक्त ठाकरे फॉर्म्युला

कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही. येथे फक्त उद्धव ठाकरेंचाच (Uddhav Thackeray)
फॉर्म्युला असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा होईल.
पण कोणत्याही परिस्थितीत लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुका (Assembly elections)
महाराष्ट्रात मविआच्या माध्यमातून लढवल्या जातील. शिवशाहीची राजवट येईल,
असा विश्वास विनायक राऊतांनी व्यक्त केला.

Advt.

नितेश राणे चिंपाट माणूस

यावेळी बोलताना विनायक राऊतांनी नितेश राणेंचाही (Nitesh Rane) समाचार घेतला.
नितेश राणे आमच्या दृष्टीने चिंपाट माणूस आहे. त्यांना किंमत देत नाही. भाजपाने भुंकण्यासाठी त्यांना पाळलं आहे.
भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही, असा टोला राऊतांनी राणेंना लगावला.

Web Title :  MP Vinayak Raut | mp vinayak raut reply devendra fadnavis over thackeray group comment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीवर ठाकरे गटाची टीका, म्हणाले- ‘राज ठाकरे उत्तम होस्ट ते…’

Prakash Ambedkar | ‘…म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा’, प्रकाश आंबेडकरांची मागणी

MLA Sanjay Shirsat | सामनातील टीकेवरुन संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले- ‘स्वत: खुडूक आणि कोंबड्याही…’