MP Vinayak Raut | ‘… तर हे 40 आमदार एकमेकांच्या उरावर बसतील’, शिवसेना खासदाराचा दावा

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन झाल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) शिंदे गटावर जोरदार टीका होत आहे. याच दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी राज्य सरकार आणि मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या तोडंला पानं पुसल्याचा आरोप विनाय राऊत (MP Vinayak Raut) यांनी केला आहे.

 

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या भूमिकेचा समाचार घेताना विनायक राऊत (MP Vinayak Raut) म्हणाले, अवकाळी पावसाने राज्यात मोठं नुकसान झालं. महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस (Rain) झाला. मेळघाटमध्ये कृषीमंत्री गेले, तरी त्याचा काही फायदा नाही. अद्याप या ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे त्यांचा दौरा कशासाठी? शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप त्यांनी केला.

 

भाजपवर (BJP) निशाणा साधताना राऊत म्हणाले, भाजपाने मुंबईमध्ये हिंदुत्वाचे जे बॅनर लावले आहेत ही भाजपची पूर्णपणे नौटंकी आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निर्बंध आणून लोकांचे प्राण वाचवण्याचे काम केले. त्यामुळे भाजपने हिंदुत्वाचे (Hindutva) बेगडी दर्शन घडवू नये, असा इशारा विनायक राऊतांनी दिला.

 

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) बोलताना राऊत म्हणाले,
चाळीसही आमदारांना मंत्रिपदाचे गाजर दाखवण्यात आले होते.
त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कदापिही होणार नाही… जर तो करण्याचा प्रयत्न झाला तर हे चाळीसही आमदार एकमेकांच्या उरावर बसतील.

 

दसरा मेळाव्याबाबत (Dasara Melava 2022) बोलताना त्यांनी दीपक केसरकर (Deepak Kesarkar)
यांनी आमची चिंता करु नये. भाजपच्या लोकांचे पाय चेपून मिळवलेलं मंत्रिपद पहिल्यांदा सांभाळा.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चिंता करु नका. दसरा मेळवा घेण्याचा फक्त आणि फक्त अधिकार उद्धव ठाकरे यांनाच आहे
आणि त्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळेल. तो होईलच असा पलटवार दीपक केसरकरांवर केला आहे.

 

Web Title :- MP Vinayak Raut | mp vinayak raut slams deepak kesarkar and uday samant over their statement about shivsena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMRDA ने 1604 सदनिकांसाठी मागविले ऑनलाईन अर्ज

 

Pune Crime | शारीरीक संबंध ठेवून लग्नास नकार दिल्याने 32 वर्षीय तरुणीची आत्महत्या; विश्रांतवाडी परिसरातील घटना

 

Deepak Kesarkar | आपले आमदार सांभाळा नाहीतर.., दीपक केसरकरांनी दिला सूचक इशारा