×
Homeताज्या बातम्याMP Vinayak Raut | खा. प्रतापराव जाधवांच्या गौप्यस्फोटाला खा. विनायक राऊतांचा पलटवार;...

MP Vinayak Raut | खा. प्रतापराव जाधवांच्या गौप्यस्फोटाला खा. विनायक राऊतांचा पलटवार; म्हणाले,”ज्या पद्धतीने कावीळ झालेल्या व्यक्तींना सगळीकडे पिवळे दिसते, त्याच पद्धतीने…”

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – MP Vinayak Raut | बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी एक गौप्यस्फोट केला होता. निवडणूकीच्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात 100 टक्के येतील, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे. निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाचे घर खाली असेल, असा दावा खासदार जाधव यांनी केला आहे. 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (MP Vinayak Raut)

 

त्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ‘ज्या पद्धतीने कावीळ झालेल्या व्यक्तींना सगळीकडे पिवळे दिसते, त्याच पद्धतीने निष्ठेला विष्ठेची जोड देणाऱ्यांना, आपण गद्दारी केली तशी इतरही करतील असे वाटत आहे.’ अशा पद्धतीने खासदार जाधवांवर विनायक राऊतांनी पलटवार केला आहे. ‘आम्ही जे कोणी आता उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आहोत ते खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे पाईक आहोत, त्यांच्या पायाच अमृत आम्ही प्यायलं आहे, निष्ठा आणि श्रद्धा काय असते हे एकनाथ शिंदे गटाने आमच्या कडून शिकले पाहिजे,’ असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे. (MP Vinayak Raut)

 

याअगोदर देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील, असा गौप्यस्फोट केला होता.
त्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले.
मात्र पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
त्यांच्या या वक्तव्यात किती तथ्य आहे, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

Web Title :- MP Vinayak Raut | shivsena MP Vinayak Raut on cm eknath shinde group mp prataprao jadhav

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | तेजस्विनी पंडित बरोबरच्या मुलाखतीत राज ठाकरेंची दिलखुलास फटकेबाजी; म्हणाले, ‘मी स्वतः कसा दिसतो, हे…’

Pune Crime | सेक्स्टॉर्शनमध्ये राजस्थानचे एक संपूर्ण गाव सहभागी; पुण्यातील तरुणांच्या आत्महत्येमुळे खुलासा

PM Narendra Modi | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पीएम नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट, ‘त्या’ ऑडिओ मेसेजनं प्रचंड खळबळ

Must Read
Related News