MPDA Act | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून 3 सराईतांवर MPDA कायद्यान्वये कारवाई, सराईतांची रवानगी जेलमध्ये

तलवार आणि घातक शस्त्राव्दारे दहशत निर्माण करत असल्याने केली कारवाई

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांनी तलवारी व घातक शस्त्र घेऊन दहशत पसरविणाऱ्या 3 गुन्हेगारांना दणका देत त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील या गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. एमपीडीएनुसार (MPDA Act) ही कारवाई केली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

राकेश प्रकाश साळवे (वय 23, रा. मंगळवार पेठ), साइराज रणाप्रताप लोणकर (वय 21, रा. कोंढवा खुर्द) आणि अजय उर्फ भज्या प्रकाश निकाळजे (वय 27, रा. काकडे वस्ती) अशी
एमपीडीएनुसार (MPDA Act) करवाई केलेल्या तिघांची नावे आहेत.

तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
राकेश हा फरासखाना पोलिसांच्या (faraskhana police station) रेकॉर्डवरचा आहे.
त्याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात दंगा, मारामारी, दहशत माजवणे असे गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior Police Inspector Rajendra Landage) यांनी त्याच्या एमपीडीएनुसार (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेंजरस ऍक्टिव्हिटी maharashtra prevention of dangerous activities act) MPDA कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांना पाठवला होता.
तर कोंढवा पोलीस ठाण्याचे (kondhwa police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil) यांनी देखील साइराज व अजय उर्फ भज्या या दोघांवर कारवाई करावी असा प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांनी त्याची पडताळणी केली.
त्यानुसार तिघांवर एमपीडीएनुसार (MPDA Act) कारवाई केली आहे.
एकाचवेळी तीन गुन्हेगारांवर कारवाई होण्याची ही पहिली वेळ आहे,
असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी या कायद्याचा प्रभावी वापर केला आहे.
गेल्या 9 महिन्यात तबल 26 गुन्हेगारांवर एमपीडीएनुसार (MPDA Act) कारवाई करत त्यांना कारागृहात (Jail) पाठवले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

Web Title :- MPDA Act | Pune Police Commissioner Amitabh Gupta takes action against 3 criminals under MPDA Act, criminals sent to yerwada jail

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

Pune Curfew | राज्यात डेल्टा+ व्हेरिएंटनं प्रचंड खळबळ ! पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)