आज मंत्री मंडळ बैठकीत जनतेवर केली कोट्यावधींची खैरात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज पार पडलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील जनतेला खुश ठेवण्यासाठी ७०० कोटी रुपयांच्या विविध योजनांना मंजुरी दिली आहे. राज्यभर सध्या दुष्काळाचे सावट आहे. मात्र फडणवीस सरकारच्या योजनेने राज्यातल्या तहानलेल्या जनतेला चांगलाच सुकाळ अनुभवायला मिळणार हे मात्र नक्की. लोकसभेची निवडणूक जवळ आली असून या निवडणुकीत चांगले निकाल आणण्यासाठी सरकारचे हे सर्व खटाटोप सुरु आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

आज घोषणा केलेल्या सरकारी खैरातीत समाजातील विविध घटकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाला या आधीच आरक्षण दिले आहे. त्यानंतर केंद्राने खुल्या प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या दोन निर्णयात ओबीसी प्रवर्ग नाराज झाला होता त्यांना खुश करण्यासाठी आता सरकारने ७०० कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली आहे.

मंत्री मंडळाच्या बैठकीत आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना आणि केंद्राची पंतप्रधान आरोग्य विमा योजना इथून पुढे एकत्रित राबवण्यात येणार आहे. गरीब रुग्णांना ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळावे या साठी हि योजना सुरु करण्यात आली आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निणर्य

– ओबीसी आणि भटक्या जातींसाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर
– ओबीसी महामंडळाला २५० कोटी रुपयांचा निधी प्रधान करणे
– भटक्या विमुक्त महामंडळाला ३०० कोटी निधी मंजूर
– इतिहासात पहिल्यांदाच वडार आणि रामोशी समाजाला विशेष पॅकेज