पदवीधारकांसाठी ‘इथं’ सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, 34 हजारापेक्षा अधिक पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही ग्रॅजुएट असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. मध्यप्रदेश लोकसेवा आयोगाने पदवीधरांसाठी व्हेकन्सी उपलब्ध करून दिली आहे. यानुसार डेपोटी कलेक्टर, डीएसपी, महसूल विभाग, जनसंपर्क आणि वित्त विभाग समवेत अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 330 पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुकांनी mppsc.nic.in आणि mppsc.com वर जाऊन अर्ज भरू शकतात. 12 डिसेंबर ही अर्जाची अंतिम तारीख आहे.

12 जानेवारी रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा दोन भागांमध्ये घेतली जाईल यानुसार एका भागात जनरल नॉलेज तर दुसऱ्यात फिजिकल टेस्ट घेतली जाईल. लेखी परीक्षा पास करणारेच फिजिकल टेस्टसाठी ग्राह्य धरले जातील.

वयोमर्यादा
यासाठी कमीत कमी वय 21 आणि जास्तीत जास्त वय 40 वयोमर्यादा आहे.

एवढा असेल शुल्क
उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 50 रुपये भरावे लागतील.

असा करा अर्ज
अधिकृत वेबसाईटवर mppsc.nic.in जा
होमपेजवरील अर्जावर क्लिक करा
त्यानंतर state services exam वर क्लिक करा
रजिस्‍ट्रेशन टॅबवर क्लिक करा
रजिस्‍ट्रेशन आयडीच्या सहाय्याने लॉगिन करा
अर्ज भरून कागदपत्रांची पूर्तता करा
शुल्क भरून अर्ज जमा करा

एवढा असेल पगार
या श्रेणीमध्ये निवड झालेल्या तरुणांना 15,800 ते 39,100 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. तर 5400 रुपये ग्रेड पे म्हणून दिले जातील. तसेच तिसऱ्या वर्गात निवड झालेल्याना 9,300 रुपये ते 34,800 रुपये दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे 3600 रुपये ग्रेड पे दिला जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/