MPSC Action On Nayab Tahsildar | Pune : नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या अनिल पाटील आणि जयश्री नाईक यांच्यावर MPSC कडून मोठी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Action On Nayab Tahsildar | पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा केलेल्या आणि नायब तहसिलदार (Naib Tahsildar) पदावर निवड झालेल्या अनिल बाबूराव पाटील (Anil Baburao Patil) आणि जयश्री गोविंद नाईक (Jayshree Govind Naik) यांच्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी कारवाई केली आहे. या दोघांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले आहे. (MPSC Action On Nayab Tahsildar)

https://twitter.com/mpsc_office/status/1663162845528489985?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1663162845528489985%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fpune%2Faction-by-mpsc-against-two-elected-as-naib-tehsildar-pune-print-news-ccp-14-amy-95-3688215%2F

या कारवाईबाबत एमपीएससीकडून ट्विटव्दारे माहिती देण्यात आली आहे. राज्यसेवा परीक्षा सन 2019 मधून अनिल पाटील आणि जयश्री नाईक यांची नायब तहसिलदार पदावर निवड झाली होती. त्या दोघांनी पात्र खेळाडू असल्याचा दावा केला होता. पण, एमपीएससीने केलेल्या तपासणीत त्यांनी खेळाडू असल्याबाबत केलेला दावा खोटा असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर एमपीएससीकडून कारवाई करण्यात आली आहे.

Web Title :  MPSC Action On Nayab Tahsildar | Pune: MPSC takes major action against Anil Patil and Jayashree Naik who were elected as Naib Tehsildars

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा