MPSC Exam 2022 | एमपीएससीकडून परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Exam 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) आगामी वर्षी म्हणजेच 2022 मध्ये आयोजित केले जाणारे सर्व अंदाजित परीक्षांचे (MPSC Exam 2022) वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे आता एमपीएससीच्या विध्यार्थ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे. एमपीएससी परिक्षेबाबत जाहीर केलेल्या तारखांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आखणी करण्यास वेळ मिळणार आहे.

 

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) परिक्षांच्या तारखा लवकर जाहीर केल्यामुळे MPSC विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला आहे. 2 जानेवारी 2022 रोजी पुर्व परिक्षा होणार आहे तर, या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यापर्यंत जाहीर होणार आहे. तसेच, मुख्य परीक्षा 7 मे, 8 मे आणि 9 मे रोजी घेण्यात येणार आहे. या मुख्य परिक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जारी करण्यात येणार आहे.

 

त्याचबरोबर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी होईल तर निकाल ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असं MPSC आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- MPSC Exam 2022 | dates of mpsc exam declared for year 2022 in maharashtra mpsc marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा