MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Exam 2023) या वर्षी इतिहासातीस सर्वात मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. गट ब व गट क संवर्गातील सुमारे ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. आज आयोगाकडून (MPSC Exam 2023) या संबंधिची जाहिरात आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Exam 2023) इतक्या मोठ्या प्रमाणात जागा भरती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सदर जागा या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क या संवर्गाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकूण ८ हजार १६९ पदांकरिता घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपीक, टंकलेखक अशा एकूण ८ हजार १६९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे एमपीएससीकडून सांगण्यात आले.
या पदांसाठीची पूर्व परिक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी आयोगाकडून घेण्यात येणार आहे. तर गट ब साठीची मुख्य परिक्षा २ सप्टेंबर २०२३ ला तर गट क साठीची मुख्य परिक्षा ही ९ सप्टेंबरला आयोगाकडून घेण्यात येणार आहे.
दरम्यान, नुकतचं स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगा विरोधात आंदोलन केले होते.
जुना अभ्यासक्रम कायम ठेवून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२४ पासून करावी या
मुख्य मागणीसह विद्यार्थी आयोगाविरोधात रस्त्यावर उतरले होते.
त्यानंतर चर्चा करून यावर मार्ग काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
त्यानंतर आज आयोगामार्फत (MPSC Exam 2023) इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियेची जाहिरात
काढल्यानंतर आता स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
Web Title :- MPSC Exam 2023 | good news for competitive examinees more than 8 thousand posts recruitment
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Navi Mumbai Police | रात्रभर फिर्य़ादीला मारहाण करत केला जातीचा उल्लेख, पोलीस उपायुक्तांचा पाहुणा
असल्याचे समजताच…; सहायक पोलीस निरीक्षकावर FIR - Dr. Deepak Sawant Accident | राज्यात नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरूच, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला अपघात
- Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा;
इऑन वॉरीयर्स संघाचा सलग चौथा विजय; एसके डॉमिनेटर्स संघानी गुणांचे खाते उघडले !!