MPSC Exam | ‘वयोमर्यादा ओलांडलेल्या MPSC उमेदवारांना मिळणार परीक्षेची संधी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Exam | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) 2 जानेवारी 2022 रोजी होणारी नियोजित पूर्व परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय काल (मंगळवारी) घेण्यात आला. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता सर्वाधिक ठरलेल्या उमेदवारांना 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी. यासाठी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यानूसार 28 डिसेंबर 2021 ते 1 जानेवारी 2022 या कालावधीत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

 

एमपीएससीकडून मागील काही महिन्यापुर्वी राज्य सेवा पूर्व परीक्षेचे (State Service Pre-Examination) आयोजन करण्यात आलं होतं. यानूसार रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी परीक्षा (MPSC Exam) होणार होती. मात्र ती परीक्षा आत पुढे ढकलली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने 17 डिसेंबर 2021 अन्वये 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत विहीत कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल त्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची एक संधी देण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. (MPSC Exam)

काय आहे अर्ज सादर करण्याचा कालावधी?

– 28 डिसेंबर 2021 रोजी 5 वाजल्यापासून 1 जानेवारी 2022 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध आहे.

– ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम कालावधी – 1 जानेवारी 2022 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत भारतीय स्टेटमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याकरिता विहीत अंतिम 2 जानेवारी 2022 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेत शुल्क भरण्याचा अंतिम 3 जानेवारी 2022 पर्यंतचा कालावधी दिला आहे.

– वरीलप्रमाणे विहीत पद्धतीने आणि विहीत कालावधीत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनाच विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी विचार करण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले.

 

Web Title :- MPSC Exam | candidates who have crossed age limit will finally get chance mpsc exam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

New Year 2022 | नवीन वर्षात विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांनी आपले आर्थिक नियोजन कसे करावे, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Corona in Maharashtra | ‘मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाबाबत 2 दिवसांत निर्णय होणार’ – आदित्य ठाकरे

Mukesh Ambani Reliance | मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, रिलायन्सचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे उद्योग जगताचे लक्ष

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 225 पेक्षा अधिक नवे रूग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी