पूरस्थितीमुळे MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील पुरस्थितीमुळे ११ ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा २४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे एमपीएससीची परिक्षा देण्याऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा पेपर क्रमांक २ ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थीती आहे. मुसाळधार पावसाने शहरात थैमान घातले आहे. धरणांतून होणारा विसर्ग आणि नद्यांनी धारण केलेल्या रुद्रावतारामुळे पुराच्या पाण्याने निम्मे शहर व्यापले आहे. कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दूध, भाजीपाला, पेट्रोलसह अन्य अत्यावश्यक सुविधांवर परिणाम झाला असून वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे.

सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शहरातील मुख्यबाजार पेठही पाण्याखाली आली. बाजारपेठेत कमरेपर्यंत पाणी साचलं असल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराची स्थिती भयावह असून या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –