MPSC Exam | MPSC चा महत्त्वाचा निर्णय! राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Exam) पदभरती परीक्षांसाठी कमाल संधीची मर्यादा रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 (State Service Pre-Examination 2022) साठी अर्ज सादर करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यासाठी एमपीएससीने (MPSC Exam) अर्ज सादर करण्यास 24 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एमपीएससीने शुक्रवारी (दि.17) परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर एमपीएससीने पदभरती परीक्षांसाठी (Recruitment Examination) कमाल संधीची मर्यादा लागू करण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी घेतला होता. मात्र काही दिवसांपूर्वी या निर्णयात फेरबदल करुन प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यात आला आहे.

 

 

मात्र एमपीएससीच्या (MPSC Exam) कमाल संधी मर्यादेच्या नियमामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी काही उमेदवारांना अर्ज सादर करता आला नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांना अर्ज सादर करता येण्याच्या दृष्टीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ (Extension) देण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. त्यानुसार आता उमेदवारांना 24 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करुन शुल्क भरता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- MPSC Exam | important decision of mpsc extension to submit application for state service pre examination 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ketki Chitale | कोणत्या कारणांमुळे पोलिसांनी केतकीला अटक केली?, राष्ट्रीय महिला आयोगाचा सवाल

 

Aadhaar Card | आधार सर्व्हिससाठी लावावी लागणार नाही मोठी रांग, घरबसल्या होईल सर्व काम

 

Udayanraje Bhosale | ‘हिंमत असेल तर दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ या’, उदयनराजेंचे अजित पवारांना आव्हान