MPSC Exam | MPSC चा मोठा निर्णय ! आता वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Exam) पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या परीक्षेच्या संधीबाबत फेरबदल करण्यात आला आहे. कमाल संधीची मर्यादा (Maximum Attempt Limit) एमपीएससीकडून रद्द करण्यात आली असून परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणेच निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा (MPSC Exam) देता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंबंधीची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली आहे.

 

वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षा देता येणार आहेत. आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं आहे.

 

एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणण्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत.
यूपीएससीच्या (UPSC) धरतीवर एमपीएससीनेही परीक्षा देण्यासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित केली होती.
त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी सहा संधी तर इतर मागासवर्गीयांसाठी नऊ संधी असा नियम मर्यादित करण्यात आला होता.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी कमाल संधी मर्यादा नव्हती.
आता आयोगाने हा निर्णय मागे घेतला असून पूर्वीप्रमाणेच परीक्षार्थींना संधी देण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- MPSC Exam | mpsc exam maximum attempt limit for mpsc canceled exams can be given as many times as per age limit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra State Government | राज्य सरकारचा तुकडे बंदी कायद्याबाबत मोठा निर्णय ! केले ‘हे’ मुख्य बदल

 

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा खून, मृतदेह फेकला निरा नदीत; 5 संशयित ताब्यात

 

Maharashtra Monsoon 2022 Update | मान्सूनची राज्यात विश्रांती, जोरदार सलामीनंतर झाले तरी काय ?