MPSC Exam | 20 नोव्हेंबरला असणार्‍या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  MPSC Exam | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Exam) घेण्यात येणा-या सहायक मोटार वाहन निरीक्षक (Assistant Motor Vehicle Inspector) मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबर 2021 रोजी ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. MPSC कडून मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

 

सहायक मोटार वाहन निरीक्षक (Assistant Motor Vehicle Inspector) मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेशपत्र MPSC च्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र बरोबर आणणे बंधनकारक (MPSC Exam) आहे. नाहीतर या परीक्षेस प्रवेश दिला जाणार नसल्याचं आयोगानं सांगितलं आहे.

दरम्यान, परीक्षा (Examination) सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
किंवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नसल्याचं म्हटलं आहे.
त्याचबरोबर कोरोनाच्या नियमांचे आणि शासनांच्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
असं आयोगाकडून सांगितलं आहे.

 

उमेदवारांना प्रवेशपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या [email protected] आणि
[email protected] या ईमेल किंवा 1800-1234-275- किंवा 7303821822 या दूरध्वनी क्रमांकावरुन कार्यालयीन वेळेत आवश्यक मदत मिळवता येईल.

 

Web Title : MPSC Exam | mpsc issue assistant motor vehicle inspector main examination 2020 admit card and release instructions for exam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dr. Bhagwat Karad | विमानातील प्रोटोकॉल तोडत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याने वाचवले प्रवाशाचे प्राण; पीएम मोदींनी दिली शब्बासकी

Pune Crime | रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं 8.5 लाखांची फसवणूक; पुण्यातील महिला टीसी अधिकाऱ्याला अटक

Winter Skin Care Tips | हिवाळ्यात त्वचा ठेवायची असेल समस्यामुक्त तर करू नका ‘या’ गोष्टींचा वापर, त्वचा राहील ‘कोमल’ आणि ‘मुलायम’