MPSC Exam | PSI पदांची निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी केली झटपट जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Exam | परीक्षांच्या तारखा आणि निकाल यावरून विद्यार्थांचा कायमच तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो, परंतु परीक्षा झाल्यावर लगेचच काही तासांतच त्याचा निकाल हाती येत असेल तर? तुम्ही बरोबर वाचताय. काही काळापासून परीक्षांच्या उशीरा तारखा आणि निकाल यावरून वादविवाद सुरू असताना एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावेळी सुपरफास्ट कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. PSI पदांच्या बाबतीत जलदगतीने म्हणजे अवघ्या काही तसांच्या कालावधीच निकाल जाहीर केल्याने विद्यार्थी वर्गामध्ये आश्चर्याची लकेर आणि सोबतच समाधान पाहायला मिळत आहे. (MPSC Exam)

 

म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी झाल्यानंतर उमदवारांना फार काळ प्रतिक्षेत न ठेवता जलदगतीने लगेचच चार तासांत आयोगाने निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे, त्यामुळे एमपीएससीच्या या सुपरफास्ट कामगिरीचे सर्वत्र चर्चा सुरू आहे. (MPSC Exam)

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या (PSI Exam News) 250 पदांवर पदोन्नती
देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील 1031 उमेदवारांची शारीरिक चाचणी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
या कालावधीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुणे केंद्रावर घेण्यात आली.
दररोज सुमारे 250 उमेदवारांची शारीरिक चाचणी कार्यक्रम पूर्ण करून 2 डिसेंबर रोजीच अवघ्या चार तासांतच
या परीक्षेची निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 250 पदांच्या नियुक्तीसाठी 16 एप्रिल 2022 रोजी
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात आली होती.
या पूर्व परीक्षेचा निकाल 9 जून 2022 रोजीच जाहीर करण्यात आला. या निकालाद्वारे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित
विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 चे आयोजन 30 जुलै 2022 रोजी करण्यात आले आणि
मुख्य परीक्षेचा निकाल 23 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला.
मुख्य परीक्षेच्या निकालातून एकूण 1031 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते.

 

दरम्यान परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ही वेबलिंक 3 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजेपासून 10 डिसेंबर 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही.
तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब, निवेदने, पत्रव्यवहार त्यानंतर विचारात घेतला जाणार नाहीत, असे आयोगाने यावेळी म्हटले आहे.

 

Web Title :- MPSC Exam | mpsc psi result selection list general merit list announced within four hours after physical test

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत