MPSC COMBINE EXAM : नियोजित वेळेआधीच फुटल्या प्रश्‍नपत्रिका

तक्रारीकडे केंद्र प्रमुखांनी दुर्लक्ष केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप 

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात आज अराजपत्रित (गट- ब) पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत जालना जिल्ह्यातील अंबड येथील मत्सोदरी शिक्षण संस्थेच्या केंद्रवर वेळे आधीच प्रश्‍नपत्रिका फोडण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

mpsc-Exam

पर्यवेक्षनकांनी सूचना दिल्यानंतरच प्रश्‍नपत्रिकेचे सील फोडावे असा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नियम आहे. मात्र अंबड येथील मत्स्योदरी कॉलेजमध्ये वेळेच्या आधीच प्रशपत्रिका फोडण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पेपरची वेळ झाल्यानंतर पर्यवेक्षकांनी प्रश्‍नपत्रिका देण्यासाठी वर्गात आले. परिक्षार्थींना प्रश्‍नपत्रिकेच्या कव्हरवर स्‍वाक्षऱ्या करण्यास सांगितल्या. मात्र, प्रश्‍नपत्रिकेच्या संच अगोदरच फुटल्याचे कृष्णा सवने या उमेदवाराच्या निदर्शनास आले. त्याने स्‍वाक्षरी करण्यास नकार दिला. तसेच शंका उपस्थितीत करून केंद्र प्रमुखांकडे तक्रारही केली. मात्र त्याकडे केंद्र प्रमुखांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप कृष्णा सवने यांनी केला आहे. तसेच या केंद्रावर दोन ते तीन वर्गात असा प्रकार घडल्याची माहिती परिक्षार्थींनी दिली आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याची माहिती परिक्षार्थींनी कृष्णा सवने याने सांगितले आहे.

Loading...
You might also like