MPSC Exam | 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Exam | कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. दोन वर्ष झाली कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना वाव मिळेना. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) राज्य सेवा पूर्व परीक्षा (MPSC Exam) रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी जाहीर केली होती. मात्र आता ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

2 जानेवारीला होणारी नियोजित एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, परीक्षेचा (MPSC Exam) सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. परिक्षा पुढे ढकलल्याने नवं वेळापत्रक जाहीर होणार आहे.

 

Web Title : MPSC Exam | The MPSC exam scheduled for January 2 has been postponed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर