MPSC परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या स्पर्धापरीक्षेच्या तारखा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धापरीक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून आयोगाच्या वेबसाइटवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज्य सेवा 2020 साठीची मुख्य परीक्षा या वेळापत्रकानुसार शनिवार दिनांक ८ ऑगस्ट पासून पुढे तीन दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार आहे. उरलेल्या सर्व विभागातील पूर्व तसेच मुख्य परीक्षा ह्या रविवारी घेण्याचे ठरवले आहे.

राज्य सेवा परीक्षा 2020 साठीची जाहिरात डिसेंबर 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच पूर्व परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार असून मुख्य परीक्षा शनिवार दिनांक 8 ऑगस्ट ते सोमवार ते दि. 10 ऑगस्ट, 2020 अशी तीन दिवसांमध्ये घेण्यात येणार आहे.

जानेवारी 2020 मध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्वपरीक्षा 1 मार्चला तर मुख्य परीक्षा 14 जून 2020 ला घेण्यात येणारआहे.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2020 साठी जानेवारी 2020 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा 15 मार्च, 2020 रोजी तर मुख्य परीक्षा 12 जुलै 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

फेब्रुवारी 2020 मध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा 3 मे 2020 ला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत,

1) संयुक्त पेपर क्रमांक 1 – दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी,
2) पेपर क्र. 2 (पोलीस उपनिरीक्षक)- दिनांक 13 सप्टेंबर 2020,
3) पेपर क्रमांक 2 (राज्य कर निरीक्षक)- दिनांक 27 सप्टेंबर 2020,
4) पेपर क्र. 2 ( सहायक कक्ष अधिकारी)- दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
MPSC

मार्च 2020 मध्ये महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2020 साठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्वपरीक्षा दिनांक 10 मे रोजी तर मुख्य परीक्षा दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

मार्च 2020 मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 17 मे 2020 मध्ये घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दिनांक‍ 18 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

एप्रिल 2020 मध्ये महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा 2020 साठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 7 जून 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

1) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेअंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1- दि. 29 नोव्हेंबर 2020 रोजी,
2) संयुक्त पेपर क्रमांक 2 (लिपिक-टंकलेखक)- दि. 6 डिसेंबर 2020,
3) संयुक्त पेपर क्रमांक 2 (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क)- दि. 13 डिसेंबर 2020,
4) संयुक्त पेपर क्रमांक 2 (कर सहायक)- दि. 20 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येणार आहे.

मे 2020 मध्ये महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2020 साठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. 5 जुलै रोजी तर मुख्य परीक्षा दि. 1 नोव्हेंबर रोजी घेण्याचे नियोजित आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2020 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षा शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्याचे नियोजित आहे.

सर्व परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये कोणताही बदल होऊ शकतो असे ही आयोगाने सांगितले आहे.

Visit : Policenama.com